जामखेड तालुका प्रतिनिधी – जिल्ह्यातील नामांकित व आपल्या अभिनयाने सर्वपरिचित असलेले टीव्ही सीरियल आणि सिनेमातून वेगवेगळ्या चॅनेल वर अभिनय करत सर्वांच्या गळ्यातील ताईत बनेलेल जामखेड तालुक्यातील ब्रम्हणपुर येथील व्यक्तिमत्त्व सिने अभिनेते बाळराजे वाळुंजकर यांना दि.८ डिसेंबर २०२४ रोजी पुणे येथे साऊ ज्योती फाउंडेशन व सर्च फाउंडेशन आयोजित राज्यस्तरिय आदर्श सिनेअभिनेता हा पुरस्कार देण्यात आला .
नेहमी वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल वर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मन जिंकत अभिनय क्षेत्रात अल्पावधीतच नाव लौकीक करणारे सिने अभिनेते बाळराजे वाळुंजकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला .
त्यांनी सोनी मराठी या चॅनेल वर ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत झी मराठीवर तू चाल पुढं तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत इन्स्पेक्टर चे काम केले .कलर्स मराठी या टीव्ही चॅनेल वर बाळू मामाच्या नावानं चांगभलं,स्टार प्रवाह वर मुरंबा ,प्रेमाची गोष्ट शुभविवाह , सन मराठी या चॅनेल वर त्यांनी मुलगी पसंद आहे या मालिकेत त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेषकांची मने जिंकली आणि अनेक चॅनेल वर काम करत आपल्या कर्तुत्वाची छाप उमटवली.
त्यांचा अभिनय असलेला कांदे पोहे सिनेमा व बॉलिवूड मधील देवा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहेत. यावेळी सिने अभिनेत्री भक्ती साधू, जानव्ही राजे पाटिल व साऊ ज्योती फाउंडेशन चे अध्यक्ष सचिन हळदे आणि विविध मान्यवर उपस्थित होते. कर्जत-जामखेड मधुन सर्व प्रेषक वर्गातून त्यांचं स्वागत होत आहे .