सीताराम सारडा विद्यालयात ढोणे मित्र मंडळाच्यावतीने वह्या वाटप

0

उपक्रमातून विद्यार्थ्यांची प्रगती साधली जात आहे – अजय ढोणे

     नगर – सीताराम सारडा विद्यालयात अजय ढोणे व निखिल ढोणे मित्र मंडळाच्यावतीने सुमारे तीन हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरिष मोडक, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, विद्यालयाचे चेअरमन मकरंद खेर, मुख्याध्यापक विठ्ठल ढगे, चंद्रकांत बोरुडे, पियुष लुंकड, प्रविण ढोणे, अभिजित ढोणे, कैलास शिंदे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी अजय ढोणे म्हणाले, सीताराम सारडा विद्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण देत आहे. विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांची चांगली प्रगती साधत आहेत. त्यामुळे या विद्यालयाच्या लौकिकात भर पडत आहे.  विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना काही अडचणी येऊ नये, त्यासाठी छोटीशी मदत देत आहोत. विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांनी सांगितलेल्या गोष्टीं आत्मसात करुन शाळेचे व कुटूंबाचे नाव उज्वल करावे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कायम तत्पर राहू, असे सांगितले.

   

  याप्रसंगी शिरिष मोडक म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थीही अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा, परिक्षा, कला, क्रीडा प्रकारात यश संपादन करत आहेत, ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. आज ढोणे मित्र मंडळाने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्याचा चांगला उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांचा त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने करुन यशस्वी व्हावे, असे सांगितले.

     याप्रसंगी अजितशेठ बोरा यांनी विद्यार्थ्यांनी आयुष्यात खूप मोठे व्हा व शाळेचे नाव उज्वल करा अशा सदिच्छा व्यक्त केल्या.  प्रा.मकरंद खेर यांनी बोलण्यापेक्षा कृती महत्वाची त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनीही आपले कर्तव्य कृतीतून दाखवावे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक विठ्ठल ढगे यांनी केले. परिचय व स्वागत रा.सू.कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन शितल शिंदे यांनी केले तर आभार अमोल कदम यांनी मानले. याप्रसंगी नि.मा.राहिंज, विजय कुलकर्णी, गणेश ताडला, प्रविण लोखंडे, चार्लस चव्हाण आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here