आजच्या सोशल मिडीयातुन अधुरे ज्ञान मिळते,ज्ञान व बौद्धिक वृद्धी वाढविण्यासाठी पुस्तकीय ज्ञानाची गरज
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
मानवी जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तकाचे महत्व मोठे असते पुस्तक वाचुन समाजाचे भान निर्माण होते. सुजान नागरिक घडण्यासाठी पुस्तक वाचन महत्वाचे असते.आजच्या सोशल मिडीयातुन अधुरे ज्ञान मिळत आसल्याने पुस्तक वाचनातुन ज्ञान वृद्धी बौद्धिक पातळी वाढविण्यासाठी पुस्तक महत्वाचे आहे.सर्वांनी काहीना काही वाचन केले पाहिजे.वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे.असे देवळाली प्रवारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले.
देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या ञिंबकराज मोफत वाचनालयच्या वतीने जागतिक ग्रंथदिनानिमित्त निवडक ग्रंथ प्रदर्शन शुभारंभ मुख्याधिकारी अजित निकत यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी मुख्याधिकारी निकत बोलत होते. यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे ग्रंथपाल संभाजी वाळके, दत्तात्रय होले, नंदकुमार शिरसाठ, आर.आर. कदम, सोमनाथ सूर्यवंशी, राजेंद्र कदम, सखाहारी सरोदे, राजेंद्र पोकळे, कृष्णा सांगळे, अमोल कांबळे, गोरख होले, चैतन्य देशमुख, सुदाम कडू, वैष्णवी सूर्यवंशी, सुभाष कुलट, नीलकंठ लगे,श्रावणी मुसमाडे, अक्षदा भोसले, सदाशिव हडप, लक्ष्मण मोरे शरदचंद्र देशमुख डी एल मानधने अशोक जाधव, विजय वाणी अँड अशोक येवले पांडुरंग कांबळे, भारत साळुंखे आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रंथ प्रदर्शनात विविध प्रकारच्या कथा, कांदबरी,स्पर्धा परीक्षा पुस्तके, ललित साहित्य, बाल साहित्य विविध प्रकारची पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.नागरिकां पासुन विद्यार्थी वर्गाने या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी सांगितले की,देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या श्री.ञिंबकराज मोफत वाचनालयात वाचकांसाठी 29 हजार पुस्तके, 23 प्रकारचे वर्तमानपञ, 70 प्रकारचे मासिके, 33 प्रकारचे साप्ताहिके, 15 पाक्षिके पालिकेत उपलब्ध आहेत.शहरातील वाचकांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.कार्यक्रमाचे सुञ संचालन आर.आर.कदम यांनी तर आभार प्रदर्शन दत्ताञय होले यांनी केली.