सुटाबुटातल्या शिक्षकाने स्वच्छ केले इस्रोचे स्टेडियम

0

आदित्य एल-१ यान लॉन्चिंगनंतर स्वेच्छेने संकलित केला कचरा

अहमदनगर :

        सुमारे ५ ते ७ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये १० हजारांपेक्षा अधिक खगोलप्रेमी प्रक्षेपणावेळी उपस्थित होते. अल्पोपहार-भोजन

    इस्त्रो-भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सी५७ रॉकेटद्वारे २ सप्टें २०२३ रोजी ११:५० वा.आदित्य एल-१ चे प्रक्षेपण प्रत्यक्ष पाहण्यासाठी जगभरातून हजारो खगोलप्रेमीची इस्रोच्या लाँच गॅलरी स्टेडियममध्ये व्यवस्था करण्यात आली होती.परंतु प्रक्षेपणानंतर रिकाम्या स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा पाहता न राहवून राष्ट्रपतींनी विशेष निमंत्रित व सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी स्वेच्छेने स्वतः झाडू व गोण्यांसह कचरा उचलून संपूर्ण स्टेडियम व समोरील मैदान स्वच्छ केले. विशेषत: कचऱ्यात सापडलेले तिरंगी ध्वज सन्मानाने सांभाळत स्वच्छ करून स्वतःजवळ देखील ठेवले.

तसेच विविध साहित्याचे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले होते.वाटलेली पत्रके, घरून आणलेले भोजन,पाणी बॉटल यांचा मोठ्या प्रमाणात कचरा संपूर्ण स्टेडियम मध्ये साचलेला होता.दुपारी सुमारे १२.३० ते सायं ५:३० या वेळेमध्ये डॉ.बागुल यांच्या मदतीला स्थानिक व्यवस्थापनाच्या मदतीने संबंधित स्वच्छता कामगार देखील धावून आले.ओला व सुका कचरा वेगळा करण्याबरोबरच प्लास्टिक बॉटल्स विशेषतः वेगळ्या करण्यात आल्या.ट्रॅक्टरट्रॉलीमध्ये कचरा भरुन कचरा डेपोमध्ये भरलेल्या गोण्या रवाना करण्यासाठी देखील डॉ.बागुल यांनी स्वतः सहकार्य केले.इस्रोच्या अधिकाऱ्यांनी बागुल यांच्या या स्वच्छतेच्या कामाची विशेष दखल घेतली.

        “जेथून आदित्य एल-१ च्या प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष सोहळा याची देही याची डोळा पाहता आला ते ठिकाण म्हणजे शिक्षक म्हणून माझ्यासाठी जणू तीर्थक्षेत्रच होय आणि तीर्थक्षेत्र सतत स्वच्छ असावीत म्हणून मी स्वच्छतेचा विडा उचलला.”असे प्रतिपादन डॉ.बागुल यांनी केले.