देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
येथील किराणा व्यापारी राम ज्ञानेश्वर शिंदे यांचा मुलगा सुशांत राम शिंदे याने सीए परिक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे.
त्यांस पुणे येथिल सीए राजेश मुंदडा यांचे मार्गदर्शन लाभले. आई वंदनाताई, वडील राम शिंदे , चुलते बाबासाहेब शिंदे आजी सुमनताई यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. सुशांत हा डाँ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक मच्छींद्र पा. शिंदे यांचा नातू आहे.
सुशांत याचे माजी मंञी आ.प्राजक्त तनपुरे, माजी आ.चंद्रशेखर कदम,संभाजी कार्ले, माजी नगराध्यक्ष भीमराज कदम, श्रीकांत चांडक, मच्छिन्द्र शिंदे,बाबासाहेब चौधरी, श्रीरामपूर पंचायत समितीच्या सदस्या डॉ सुनीता आसने, मराठी पञकारपरिषद उत्तर अहमदनगर जिल्ह्याचे मार्गदर्शक व सल्लागार राजेंद्र उंडे यांच्यासह विविध स्तरातुन राजकीय, अधिकारी, व्यापारी संघटना आदींनी अभिनंदन केले.