कोळपेवाडी वार्ताहर :-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.
महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता आणि कक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमान आहे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाकडून तालुका निहाय आयोजनानुसार विविध महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतर विद्याशाखीय अभ्यासक्रमाचे विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. मंगेश वाघमारे तसेच वनस्पती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. मंगेश खर्डे व एस. एम. बी. टी. महाविद्यालय संगमनेर चे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शैक्षणिक व्यवस्थेत झालेल्या बदलांची अंमलबजावणी बाबत कार्यशाळेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.