कोपरगाव प्रतिनिधी :- २०१६ मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज आण्णा मंजुळे यांनी नवख्या कलाकारांना सोबत घेऊन तयार केलेल्या सैराट या मराठी चित्रपटाने संपूर्ण मराठी चित्रपटांचे रेकॉर्ड तोडत सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला होता या चित्रपटाचे मुख्य कलाकार आकाश ठोसर म्हणजे परशा च्या मित्राची भूमिका बजावणारे अभिनेते अरबाज शेख (सल्या) यांनी आपल्या भूमिकेने सर्वांची मने जिंकत आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवत सेनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करत सगळीकडे सल्या या नावाने परिचित झालेल्या सल्ल्याने पवित्र रामनवमीच्या दिवशी जगभरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा समाधी स्थळ शिर्डी येथे पत्नी सिमरन सोबत दर्शन घेतले.याप्रसंगी मंदिर सुरक्षा प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी त्यांचा सन्मान केला
तसेच शिर्डी पासून हाकेच्या अंतरावर असलेले जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त पाहवा लागत नाही असे गोदावरी नदीकिनारी वसलेल्या जगातील एकमेव असलेले परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात अभिनेते अरबाज शेख यांनी सपत्नीक मनोभावे पूजा आरती करत दर्शन घेतले. तसेच मंदिराचा संपूर्ण इतिहास व महत्त्व जाणून घेतले. याप्रसंगी अभिनेते अरबाज शेख व त्यांचा पत्नीचा शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे माजी सदस्य आदिनाथ ढाकणे यांनी सन्मान केला.
याप्रसंगी अभिनेते अरबाज खान यांनी जगप्रसिद्ध श्री साईबाबा समाधी शिर्डी व कोपरगाव येथील परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचे संपत्नीक दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाल्याचे सांगत शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली असल्याचे सांगितले दोन्ही मंदिराच्या परिसरात सल्ल्याला पाहताच अनेक लहान मोठ्यां चाहत्यांची सेल्फी घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. याप्रसंगी अभिनेते अरबाज खान यांच्यासोबत त्यांची पत्नी सिमरन शेख त्यांचा मित्र अमर, कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, शिर्डी येथील सार्थक कोळपकर, अमोल बडे तसेच राज्य पत्रकार संघाचे कोपरगाव तालुका सचिव प्रा.विजय कापसे उपस्थित होते