कोपरगांव :- दि. २८ डिसेंबर २०२२
तालुक्यातील सोनारी येथील ८७ लाख रूपये खर्चाच्या जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी मोहन शेलार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर जल योजनेची कोपरगांव विधानसभा मतदार संघात परिपुर्ती होत असल्याचे सौ. कोल्हे यावेळी बोलताना म्हणाल्या.
प्रारंभी धोंडीबा कारभारी सांगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सरपंच सौ. शालिनी ब्रदीनाथ सांगळे यांनी प्रास्तविकात सदर योजनेच्या कामाची माहिती दिली. ग्रामविकास अधिकारी भानूदास दाभाडे यांनी सोनारी ग्रामपंचायतीमार्फत केलेल्या विकास कामांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचा सोनारी ग्रामस्थांनी सत्कार केला. गणेश कुटे, धारणगांवचे सरपंच दिपक चौधरी यांची यावेळी भाषणे झाली.
सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघातील वारी कान्हेगाव, कोळपेवाडी, कुमारी, जेउरकुमारी, सुरेगांव, मळेगांवचडी, मायगांवदेवी, शिंगणापुर, रांजणगांव देशमुख व सहा गांवे, धारणगांव व ४ गांवे अशा दहा पाणी पुरवठा योजनांना जल जीवन मिशन अंतर्गत १९२ कोटी ४८ लाख रूपये तर उर्वरीत ५३ ग्रामपंचायतींच्या जल जीवन मिशनसाठी ८५ कोटी असे एकुण २७७ कोटी रूपये हर घर जल योजनेतुन मंजुर केले आहे. गांवच्या विकासात सर्वांनी एकोपा दाखवून सहकार्यांची भावना ठेवावी. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे याचं आणि कोपरगांव विधानसभा मतदार संघातील जनता अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे मिळालेली सत्ता आणि पद हे जनविकासाच माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्री महोदयाकडे कोपरगावच्या प्रलंबित विकास योजनाचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून रवंदे सोनारी या खराब रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवू. सोनारी जल जीवन मिशन योजना महिलांसाठी मैलाचा दगड असुन त्याचे काम चांगल्या पध्दतीने होण्यासाठी सर्वच घटकांनी सहकार्य करावे असेही त्या शेवटी म्हणाल्या.
याप्रसंगी सर्वश्री बद्रीनाथ सांगळे, उपसरपंच सौ पौर्णिमा शरद सांगळे, रवंदे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदिप कदम, रमेश उगले, संतोष दवंगे, शिवाजीराव दवंगे, जयराम सांगळे, रामनाथ सांगळे, शरद सांगळे, प्रभाकर आव्हाड, अनिल सांगळे, प्रविण सांगळे, म्हाळू आघाव, अर्जुन शेलार, विनोद सोनवणे, पंढरीनाथ सांगळे, वसंतराव सांगळे, जनाबाई मोरे, प्रभाकर आव्हाड, डॉ राजकुमार दवंगे, गणेश चोरात यांच्यासहविविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते शेवटी बद्रीनाथ सांगळे यांनी आभार मानले.