सोनेवाडीच्या रोहितला जर्मनीत नोकरी.. राज्यपाल व मंत्र्यांच्या हस्ते मुंबईत सन्मान

0

18 ते  29 लाखाचे वार्षिक पॅकेज

कोपरगाव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील माजी उपसरपंच किशोर शिवराम जावळे यांचे चिरंजीव रोहित किशोर जावळे यांना युवा भारत कुशल भारत उपक्रमांतर्गत  जर्मनीत नोकरी व पुढील पदवी शिक्षणासाठी ड्युयल डिग्री साठी निवड झाली आहे. रोहित व त्याच्या कुटुंबाचा काल मुंबई सह्याद्री अतिथीगृहावर राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल उद्योगाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, रोजगार विभागाचे आयुक्त डॉ रामास्वामी एन, राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर व विविध देशाचे मुंबईतील वाणिज्य दूत व्यवसाय शिक्षक व प्रशिक्षण संचालक दिगंबर गवळी आदी प्रमुखांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोहित जावळे यांनी आयटीआय मध्ये टूल ऍण्ड डायमेकर या विषयाचे प्रशिक्षण घेतले .रोहीत ला या कामी Leo & Sagitarius या संस्थेचे पुरुषोत्तम वाघ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.परदेशात निवड झालेल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना 18 ते 29 लाखांचे पॅकेज मिळणार असल्याने आयटी पेक्षा आयटीआयचे विद्यार्थी भारी पडले आहे.

साधू संतांची भूमी म्हणून महाराष्ट्रा कडे पाहिले जाते.

जर्मनी आणि जपान येथे महाराष्ट्रातील तरुणांनी नोकरीसाठी स्थान निर्माण करणे ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.या अंतर्गत महाराष्ट्रातील 55 युवकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून यामध्ये सोनेवाडीच्या रोहित जावळे चा समावेश झाला आहे.रोहीतच्या निवडीने सोनेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे..

दहावी पास झाल्यानंतर युवक आयटी इंजिनिअरिंग डॉक्टर वकील इत्यादी शिक्षणाकडे वळतात. त्यामध्ये प्रचंड पैसा व वेळ लागतो. आम्ही रोहितची आयटीआय चे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रबोधन केले. व त्यानेही ध्येय चिकाटी ठेवत हे प्रशिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षित झाले तरच परदेशात नोकरीसाठी जाता येते असे नाही तर जिद्द आणि मेहनत असेल तर कोणत्याही क्षेत्रात यशाची सर्वोच्च शिखरे गाठता येतात .. किशोर जावळे .. वडील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here