सोनेवाडीच्या श्री वीरभद्र बिरोबा महाराजांच्या यात्रेला प्रारंभ

0

उद्या जंगी कुस्त्यांचा हंगामा

सोनेवाडी (वार्ताहर) :कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री वीरभद्र बिरोबा महाराज यात्रेला आज बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला असून उद्या गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते सहा या वेळेत जंगी कुस्त्यांचा हंगामा रंगणार आहे.विरभद्र बिरोबा महाराज यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने मंदिराभोवती सुशोभीकरण व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवारी सकाळी आठ ते अकरा वाजता बिरोबा महाराजांच्या मूर्तीची पूजा होमहवन व अभिषेक होणार आहे. सायंकाळी पाच वाजता काठीची व मुखवट्याची भव्य मिरवणूक सोनेवाडी गावातून निघणार आहे. रात्री नऊ वाजता शोभेशी दारू उडवण्यात येणार असून तमाशाचा देखील कार्यक्रम होणार आहे.

गुरुवारी सकाळी आठ वाजता तमाशा कलावंतांचा हजाऱ्यांचा यांचा कार्यक्रम होणार आहे. व नंतर दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्याला सुरुवात होणार आहे. या कुस्ती हंगामामध्ये महाराष्ट्रभरातून नामवंत मल्य उपस्थित राहणार आहे. कुस्तीत विजयी  मल्यांना पैलवानांना योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे. कुस्तीचा आखाडा हा यात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहे.काल सकाळपासूनच यात्रेमध्ये खेळणी दुकानदारांनी आपले पाल लावले असून अजूनही दुकानदार साहित्य विक्रेते यात्रेसाठी येत आहे.श्री गुरुभद्र बिरोबा महाराजांची यात्रा शांततेत होण्यासाठी यात्रा कमिटी कडून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना निवेदन व पत्रिका दिलेली आहे.तेव्हा या यात्रेसाठी सोनेवाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विरभद्र बिरोबा यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here