सोनेवाडी (वार्ताहर)कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विध्यार्थ्यांनी शारीरिक मानसिक व बौध्दिक विकासाकरिता नियमितपणे योगा करण्याचे आवाहन यावेळी निरंजन गुडघे व उपसरपंच संजय घोडके यांनी केले.
यावेळी योगासने प्राणायाम ध्यान करत विध्यार्थी,शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी योगा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला. यावेळी योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर केली सुक्ष्म व्यायाम,पद्मासन,भुजंगासन शलभासन त्रिकोणासन,वृक्षासन, ताडासन,सूर्यनमस्कार ,शवासन,नावासन,अनुलोम विलोम प्राणायाम पूर्व तयारी यासह योगा संदर्भात शास्त्रोक्त माहिती देवून त्याचे निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी होणारे फायदे सांगितले. विद्यार्थ्यांबरोबरच उपसरपंच संजय गुडघे, निरंजन गुडघे, प्रभारी मुख्याध्यापक अण्णासाहेब मोकळ, विलास गवळी, कविता पानसरे, सुरेश धनगर, कांचन मोकळ, चंद्रविलास गव्हाणे आदींनी योगा करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रविलास गव्हाणे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक अण्णासाहेब मोकळ यांनी मानले.