पोहेगांव (प्रतिनिधी): कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे ग्रामस्थांनी एकत्र येत होळी पेटवली. हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा सण मानला जाणारा होळी सण साजरा करण्यात आला.
चिमुरड्यांनी संध्याकाळी गवऱ्या गोळा करत हनुमान मंदिरासमोर होळी उभी केली. संध्याकाळी सहा वाजता ही होळी पेटवण्यात आली.यावेळी माजी सरपंच पांडुरंग जावळे, हरिभाऊ जावळे, गोपीनाथ जावळे, पी डी आहेर, धर्मा जावळे, आबासाहेब दहे, दिगंबर जावळे, बापूराव जावळे, प्रभाकर जावळे,मनराज खरे,बबलू जावळे, अर्जुन जावळे, लक्ष्मण जावळे अदी उपस्थित होते.
आपल्या मनातील वाईट विचारांना होळीच्या आगीत जाळून राख करावी असे ग्रामस्थांनी सांगितले. होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरा करण्यात येतो यावेळी ग्रामस्थ एकत्र येत या सणांचा आनंद घेतात.