कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात पोहेगांव, नगदवाडी येथे रोहिणी व मृगाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरण्या करून घेतल्या. पिकांची उगवण झाली. उघडीत दिलेल्या पावसाने पूर्ण काल परवा हजेरी लावल्याने येथील शेतकरी सुखावला मात्र बाजूलाच तीन किलोमीटर असलेल्या चांदेकसारे घारी डाऊच खुर्द डाऊच बुद्रुक परिसरात अजून पावसाचा थेंबही पडला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे या परिसरात आभाळ कोरडेच राहिले आहे.
मुळात हा परिसर प्रजन्य छायेखाली असल्याने पाऊस पण बे भरोसाने पडतो. या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठीच ब्रिटिश सरकारने दारणा गंगापूर धरणाची निर्मिती करून गोदावरी उजव्या कालव्याद्वारे परिसरात पाणी आणले होते. आज वाढत्या पाणी मागणीमुळे गोदावरी कालव्याचे पाणी देखील चांदेकसारे परिसरात मिळेनाशे झाले आहे. जमिनीचा पोत व सुपीकता चांगली असताना देखील केवळ पावसाची दरवर्षी हुलकावणी मिळाल्याने या परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत पूर्ण तयारी केली आता फक्त चाड्यावर मूठ धरायची बाकी आहे. मात्र या परिसरात पाऊसच नसल्याने शेतकरी स्तब्ध झाले आहे. सोनेवाडी परिसरात योग्य वेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मका सोयाबीन कपाशी अदी पिके घेतली आहे. मृगाची पेरणी झाल्यानंतर पिकाची उत्पादन क्षमता ही जास्त मिळते असे जुने जानते शेतकरी सांगत आहे. 22 23 24 25 26 या तारखेला हवामान खात्याने या परिसरात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला मात्र दोन दिवसात काही भागातच पाऊस झाला आहे. आता पुढील दोन-तीन दिवसात चांदेकसारे परिसरात पाऊस झाला तर हा शेतकरी ही सुखी होईल.