पोलीस स्टेशन बंदोबस्त करावा.. नागरिकांची मागणी
कोपरगाव ( वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडीला धार्मिक वारसा म्हणून बघितले जाते येथील मंदिरांचा जीर्णोद्धार नागरिकांनी करून घेतला आहे मात्र याच मंदिरात दिवसाढवळ्या पत्त्याचा डाव मांडला जातो. यात तळीरामायांचा जास्तीचा समावेश असतो. दारू प्यायला पैसे कमी पडल्याने मंदिरातील साहित्यांची ही चोरी होत असल्याची घटना काल घडली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला असून अनेक ठिकाणी दारूचे गुत्ते चालू आहे. हे दारूचे गुत्ते पोलिसांच्या मेहेरबानीने चालू आहे की काय असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारात आहे. दारूच्या गुत्यामुळे तरुण व्यसनधीन बनले असून ज्येष्ठ नागरिकांना देखील हे जुमानत नाही. मंदिराच्या अवतीभवती या तळीरामांचा मोठा धिंगाणा असतो. यांना काही सांगायला गेले की ते उलट ते ज्येष्ठ नागरिकांच्याच अंगावर जाऊन येतात. काल तर संध्याकाळी हद्दच झाली निळकंठ महादेव मंदिरातील नाम जप करणारे यंत्र एका तळीनामाने दिवसाढवळ्या काढून नेले. हा तरुण अर्ध नग्न होऊन संपूर्ण गावात नाचला. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला. मागील काही महिन्यापूर्वी देखील महादेव मंदिरातील अकरा किलो पितळ धातूची असलेली समयी, मंदिरातील छोटा घंटा या तळीरामाने चोरून नेला आहे. तळीरामांना दारूला पैसे मिळत नसल्याने त्यांनी मंदिरासह आजूबाजूला असलेले शेतकऱ्यांच्या विविध साहित्यावर डल्ला मारण्याचा धडाका सुरू केला आहे. परिसरात दारू विक्रीला उधान आले असून दारूचे गुत्ते बंद व्हायला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन ने सोनेवाडी परिसरातील किराणा दुकानावर धाड मारून पेट्रोल विक्री बंद केली गुटका विक्री बंद केली मग पोलीस स्टेशनला दारूचे गुत्ते दिसत नाही का असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे. तळीरामांचा बंदोबस्त मंदिर परिसरातील पत्याचा डाव, व अवैद्य धंदे बंद करा अशी मागणी सोनेवाडी परिसरातून होत आहे.