सोनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात..

0

ग्रामस्थांकडून शाळेसाठी भरीव मदत, संत महंतासह राजकीय नेते देखील उपस्थित

कोपरगाव (प्रतिनिधी ) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 15 ऑगस्ट 76 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

ध्वजपुजण न्युरो सर्जन डॉ. संदीप जावळे यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वजारोहण डी एम कार्डिओलॉजी डॉ राहुल गुडघे यांनी केले. ग्रामस्थांकडून शाळेसाठी भरीव मदत मिळाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच शकुंतला गुडघे होत्या.

भूमिपुत्र डॉ राहुल गुडघे ,डॉ संदीप जावळे, इंदापूर पंचायत समितीचे उपअभियंता शिवाजी राऊत, राहुरी पंचायत समितीच्या सौ राऊत, महाराष्ट्र राज्य उद्योग आघाडीचे सरचिटणीस भिमराज भालेराव यांचा

आई वडील व कुटुंबासमवेत सन्मान करण्यात आला.यावेळी महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, डॉ यशराज महाराज, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, उपाध्यक्ष अमरनाथ खुरपे, केशवराव होन, बाळासाहेब रहाणे ,संजय गुरसळ, रावसाहेब थोरात,किरण होन, जयद्रथ होन, सुभेदार शांतीलाल होन, ज्ञानदेव औताडे, कल्याण होन, डॉ गोरक्षनाथ रोकडे,आर पी होन, तामिळनाडू येथील साईभक्त, शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र रहाणे, विलास गवळी, मनोहर वहाडणे, सुरेश धनगर, चंद्रविलास गव्हाणे, अनिल पराड, श्रीमती कविता पानसरे,कर्मवीर शंकरराव काळे विद्यालयाचे मुख्याध्यापक राठोड आर. एल. , जगताप सी.एम., पवार पी. बी., ढेरे पी. व्ही., गुडघे  एस. एस, श्रीमती होन , गायकवाड ए बी , दोन्ही विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच उपसरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, व ग्रामस्थ अदी उपस्थित होते.

तामिळनाडू येथील साईभक्त अण्णा यांनी विद्यार्थ्यांसह 5 हजार नागरिकांना मिष्ठान्न जेवण दिलं होतं. शाळेच्या वतीने व ग्रामपंचायतच्या  वतीने तामिळनाडू येथील सर्व साई भक्तांचा सन्मान करण्यात आला. प्रभात फेरी, पुलवामा अटॅक गीत, विद्यार्थ्यांची मनोगते अदी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुठलीच कमतरता नसून दर्जेदार शिक्षण मिळण्याचे हे एकमेव साधन असल्याचे युवानेते विवेक कोल्हे यांनी सांगितले. तर प्रमोद वाकोडकर  यांनी ही शाळा आदर्श असून या शाळेतील विद्यार्थी उच्च शिखरावर पोहोचतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रविलास गव्हाणे यांनी केले तर आभार 

मनोहर वहाडणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here