नगर – मार्केट यार्ड येथील संजय मेडिकल फर्मचे संचालक रसिकलाल हिरालाल गांधी (बडाभाऊ) यांच्या पत्नी सौ.ज्योती रसिकालाल गांधी यांचे मंगळवार दि.12 सप्टेंबर 2023 रोजी संथारा व्रतात दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्या 55 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर नालेगांव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जैन धर्माच्या तत्वानुसार त्यांना प.पू. अलोकऋषीजी म.सा. यांच्या उपस्थितीत संथारा देण्यात आला होता. स्व.ज्योतीबाई गांधी यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. माजी नगरसेवक विलास गांधी यांच्या त्या भावजयी होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.