कोपरगाव : भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव शहरातील रस्ते, पूल, गटारी, पेव्हर ब्लॉक आदी विविध विकासकामांसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अशा वेगवेगळ्या योजनांमधून ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. नवीन प्रभाग क्र.११ मधील विकासकामांसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत ८८ लाख ३९ हजार रुपये विक्रमी निधी मिळाला असून, हा निधी मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेविका हर्षाताई दिनेश कांबळे यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत नवीन प्रभाग क्र.११ मधील विकास कामांसाठी ८८ लाख ३९ हजार रुपये विक्रमी निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून राम मंदिर ते सेवा निकेतन स्कूलसमोरून (बाळू दीक्षित यांचे घर) जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (१८,४६,००० रुपये), मन्सुरी यांचे घर ते हनुमान मंदिरापर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे (१९,८९,१०० रुपये), नितीन पवार यांचे घर ते मन्सुरी यांच्या घरापर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे (१०,११,७०० रुपये), भारस्कर यांचे घर ते शेख यांच्या घरापर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे (१०,०९,५०० रुपये), माऊली मंगल कार्यालय ते भारस्कर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (१२.७८.९०० रुपये), वालझडे किराणा स्टोअर्स ते नवीन कब्रस्थानपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (१७,०४,२०० रुपये) ही कामे होणार आहेत.
कोपरगाव नगर परिषद हद्दीतील शहरातील विविध भागातील मुख्य डांबरी रस्ते, अतिमहत्त्वाचे तीन पूल, अंतर्गत रस्ते, गटारीचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक आदी विविध कामांसाठी शासनाने निधी द्यावा, यासाठी माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला होता. कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे कोपरगाव शहरातील रस्ते, पूल, गटारी, पेव्हर ब्लॉक आदी विविध विकासकामांसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अशा वेगवेगळ्या योजनांमधून ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध भागातील रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण, पुलांचे व गटारीचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक अशी विविध कामे करण्यात येणार असून, या कामांना प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. नवीन प्रभाग क्र.११ मधील विविध विकासकामांसाठी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी ८८ लाख ३९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी नगरसेविका हर्षाताई दिनेश कांबळे यांनी त्यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. प्रभाग क्र.११ मधील विविध विकास कामांसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.