कोपरगाव : माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव शहरासाठी वेगवेगळ्या योजनांतर्गत ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. त्यात नवीन प्रभाग क्र.८ मधील विकासकामांसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत १ कोटी ७८ लाख २१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हाजी अल्ताफभाई करीमभाई कुरेशी व माजी उपनगराध्यक्ष आरिफभाई करीमभाई कुरेशी यांनी स्नेहलताताई कोल्हे व विवेक कोल्हे यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
नवीन प्रभाग क्र.८ मधील नागरिकांचे अनेक प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असून, विकासाला खीळ बसली आहे. विद्यमान आमदारांच्या दुर्लक्षामुळे शहराचा विकास खुंटला आहे. नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर व शहराच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील विविध भागातील मुख्य डांबरी रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण, अतिमहत्त्वाचे तीन पूल, अंतर्गत रस्ते, गटारीचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक आदी विविध कामांसाठी निधी द्यावा, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अशा वेगवेगळ्या योजनांमधून ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे.
त्याअंतर्गत नवीन प्रभाग क्र.८ मधील विकासकामांसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत १ कोटी ७८ लाख २१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून धारणगाव रोड ते मार्केट यार्ड अप्रोच रोड (बैल बाजार रोड) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (९९,९१०७९ रुपये), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह ते मुंदडा बिल्डिंगपर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (१८,१३,२७२ रुपये), खंदकनाला पुलापासून टोमॅटो मार्केट रस्त्याचे खडीकरण व काँक्रीटीकरण करणे (९,६२,४३५ रुपये), खंदकनाल्यावर कासलीवाल संरक्षक भिंतीसमोर पुलाचे बांधकाम करणे (५०,५५,००० रुपये) ही कामे होणार आहेत. माजी आमदार तथा भाजप प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे नवीन प्रभाग क्र.८ मधील विविध विकासकामांसाठी १ कोटी ७८ लाख २१ हजार रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध कामे मार्गी लागणार असल्यामुळे स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांना नागरिक धन्यवाद देत आहेत.