जामखेड तालुका प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यातील धडाडीचे असलेले सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांची जिल्हा सत्र न्यायालयाने भादवि कलम ३०७ च्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली असून हा महत्वपूर्ण निकाल अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयातील श्रीगोंदा कोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश एम. एस. शेख यांनी दिला आहे. जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांचे विरोधात सन २०२२ मध्ये जामखेड पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता कलम (आयपीसी) ३०७ नुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये दि. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याची अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयातील श्रीगोंदा कोर्टात खटला चालू होता.
त्यानुसार दि. १० मार्च २०२५ रोजी सदर केसचा निकाल लागला असून यातून स्वप्नील खाडे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. हा निकाल अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयाचे श्रीगोंदा कोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश एम. एस. शेख यांनी दिला आहे. या खटल्यात स्वप्नील खाडे यांच्या वतीने ॲड. सुमित पाटील तर सरकार पक्षातर्फे ॲड. कुलकर्णी यांनी काम पाहिले.