जामखेड तालुका प्रतिनिधी. – हमाल माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि या कायद्याची जाणिवपूर्वक केली जात असलेली बदनामी तात्काळ थांबवावी तसेच कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शुक्रवार दि. ३ मार्च २०२३ रोजी हमाल मापाडी कामगारांच्या वतीने जामखेड तहसिल कार्यालय येथे जामखेड चे नायब तहसीलदार यांना जामखेड तालुका हमाल पंचायत चे तालुकाध्यक्ष राहुल उगले पाटील यांनी निवेदन दिले.
या विषयी अधिक माहिती देतांना ते म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून आवक वाराईचा, महिलांचा मजुरी, ठोक वराई
भराईचा करार ३ वर्षांपासून संपलेला आहे. वाढीव मंजुरी अद्यापही मिळालेली नाही मजुरी कोणाकडून घ्यायाची हाही प्रश्न प्रलंबित आहे. अनोंदीत कामगारांची दखल माथडी मंडळ घेत नाहीत. माथाडी मंडळातून कामगारांना वेळेवर पगार होत नाही. सर्व विभागातील नवीन आस्थापना माथाडी मंडळात नोंदीत करणे आवश्यक आहे तसेच लोखंड बाजार विभागातील व फरशी विभागातील आस्थापना नोंदीत नाहीत. कामगारांचे पगाराचे चेकची वसुली माथाडी मंडळाने आस्थापना मालकांकडून काटेकोरपणे करणे. माथाडी मंडळाने
कामगारांचे इन्शुरन्सचे क्लेम अद्यापपर्यंत पास केलेले नाहीत. इन्शुरन्स संपलेले असताना माथाडी मंडळाने इन्शुरन्स वेळेवर रेन्युअल केलेला नाही. ५० किलो वजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे. मार्केट कमिटीमध्ये काम करण्याचे वेळेचे बंधन अत्यावश्यक आहे. प्रचलित लेव्हीत वाढ करण्यात यावी, आदि मागण्यांचे निवेदन जामखेड चे तहसीलदार देण्यात आले.यावेळी जामखेड हमाल पंचायत चे तालुकाध्यक्ष राहुल उगले,दीपक सदाफुले,दीपक बोराडे,सुकेंद् सदाफुले,शंकर चवधर,विनोद यादव,देवीदास जरे,संजय शेळके,शिवाजी पुरी,शिवाजी गायकवाड,शेळके मामा,व सर्व हमाल मापाड़ी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.