जामखेड तालुका हादरला
जामखेड तालुका प्रतिनिधी : – जामखेड तालुक्यातील हाळगाव येथे एका एका महिलेसह तिच्या दोन बालकांचे मृतदेह आढळून आले असून हे मृतदेह एका शेततळ्यात तरंगताना आढळून आले आहेत. सदर महिला व मुले दि. १० जुलै पासुन बेपत्ता होती. तर दि. १२ जुलै रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे. जामखेड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. असून या प्रकरणाची जामखेड पोलीस कसून चौकशी करत आहेत.
सविस्तर असे की, जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील हाळगाव येथील पोलीस पाटील सुरेश यशवंत ढवळे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला खबर (माहिती) दिली की हाळगाव येथील शेतकरी भीमराव माहदू पिंपळे रा. हळगाव यांच्या गट नंबर ४३४ मधील शेतातील शेततळ्यामध्ये दोन स्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह पाण्यामध्ये तरंगत आहेत. व प्रेत ही हळगाव गावातील असून त्यातील चांदणी उर्फ उमा बबन पाचरणे (वय ३१) दिपाली बबन पाचारणे (वय ११) व राजवीर बबन पाचारने वय (८ वर्ष) अशी त्यांची नावे आहे. मिळालेल्या खबरीवरून जामखेड पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यू रजिस्टर ४१/२०२३ सीआरपीसी १७४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे व यानंतर जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे पोलीस कर्मचारी घेऊन घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहचल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने सदर प्रेतांना शेततळ्यातून शेत तलावाच्या बाहेर काढले. व दोन वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून त्या मृतदेहांचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.
सदर महिला व मुले दि. १० जुलै रोजी सायंकाळ पासूनच बेपत्ता होती. त्याबाबत दि. ११ रोजी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करण्यात आली होती व काल दि. १२ रोजी त्यांची प्रेत मिळाली आहेत. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करीत आहेत.
चौकट
सदर घटनेतील मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त करून प्रस्तुत प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत आहेत
पोलीस निरीक्षक महेश पाटील