देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहता पोलीस ठाण्यातील हवालदार प्रभाकर भाऊराव शिरसाठ यांना पदोन्नती मिळाली असून ते आता सहाय्यक फौजदार बनले आहेत. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील अनेक दिवसांपासून रखडलेली हवालदार पदोन्नती नुकतीच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार मार्गी लागली आहे. प्रभाकर शिरसाठ यांची हवालदार पदाहून पदोन्नती होवून सहाय्यक फौजदार पदावर नियुक्ती झाली. शिरसाठ यांनी पाथर्डी, श्रीरामपूर तालुका, शिर्डी, राहुरी,या ठिकाणी तर देवळाली प्रवरा पोलिस चौकीत चार वर्ष त्यांनी कारभार सांभळला आहे. सध्या ते राहता पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत.