१०३ वर्षाच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क 

0

सोनेवाडी 77 टक्के मतदान

कोपरगाव (प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे काल विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले.न्यायाधीश मेघराज जावळे यांनी आपल्या मतदानाचा हक्क सोनेवाडी येथील मतदान बुधवारी बजावला. तर वयोवृद्ध 103 वर्षाच्या आजी शांताबाई गंगाधर गुडघे यांनी आपले मतदान नोंदवले. तर देर्डे चांदवड येथे लक्ष्मीबाई नारायण  मेहेत्रे वय 101 या आजींनी आपले मतदान नोंदवले.

सोनेवाडी येथे ३९१४ मतदानापैकी ३०१९ मतदारांनी आपले मत नोंदवले. संध्याकाळी पाच वाजता महावितरण कंपनीने वीज खंडित करत मतदानाच्या प्रक्रियेची गती कमी केले. मात्र  कार्यकर्त्यांचे फोन गेल्यानंतर पुन्हा महावितरण कंपनीकडून येथे वीज परवठा सुरळीत करण्यात आला.२२३ प्रभागामध्ये १४०२ पैकी १०४४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.२२४ प्रभागामध्ये १२१२ पैकी ९७३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.२२५ प्रभागामध्ये १३०० पैकी १००२ मतदारांनी आपली मतदान केले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन ने बंदोबस्त पुरवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here