१२ . ८१ लाखाचे स्टील चोरणारी टोळी राहुरी पोलिसांनी केली गजाआड !

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                राहुरी तालुक्यातील उंबरे शिवारातील तांबे पेट्रोलपंपा शेजारील १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीची लोखंडी स्टील मुद्देमाल चोरणारी टोळी गजाआड.

             याबाबत बातमीची हकीकत अशी की, राहुरी पोस्टे गु.र.नं। १९५६/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यतील स्टील चोरी करणारे आरोपींचा शोध घेण्यासाठी  पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, साहय्यक फौजदार चंद्रकांत ब-हाटे, पो.हे.कॉ. दिनकर चव्हाण, पो.हे.कॉ.सोमनाथ जायभाय, पो.ना.  अमित राठोड, पो.कॉ. अदिनाथ पाखरे पो.कॉ.सचिन ताजणे पो.कॉ.संतोष राठोड, पो.कॉ.गणेश लिपणे,पो.कॉ.नदिम शेख यांचे  विशेष पथक नेमण्यात आले होते. 

         पोलिस निरीक्षक  प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि आरोपी नामे १) अभिषेक बाबासाहेब हुडे २) हर्षल दत्तात्रय ढोकणे दोघे रा. उंबरे ता. राहुरी यांनी गुन्हा केलेला आहे. गोपनीय माहीती मिळाल्याने सदर आरोपी यांना सापळा लावुन उंबरे शिवारात जेरबंद करुन त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा आम्ही व ३)जयेश उर्फ गुलाब बाबासाहेब ढोकणे ४) छोट, उर्फ सौरभ संजय दुशिंग ५) राहुल दादु वैरागळ सर्व रा. उंबरे ता. राहुरी जि. अ.नगर असे आम्ही मिळुन केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यांनी गुन्ह्यातील एकुण मुद्देमाल १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे लोखंडी स्टील व गुन्हा करणेकामी वापरलेले महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, टाटा कंपनीची  मॉडेलची टेंपो हे आरोपींनी दाखवल्याने वरील मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.

                पोलीस अधिक्षक, राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर भाग श्रीमती स्वाती भोर , उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग  संदिप मिटके, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here