४० गरजू परिवारास डोके परिवाराच्या वतीने अत्यल्प दरात घरांसाठी जागा

0

नगर –  शासनाचा वनश्री प्राप्त स्व.बलभीम डोके व उषादेवी डोके यांच्या स्मरणार्थ नगरच्या डोके परिवाराच्या वतीने ४० गरजू व गरीब कुटुंबीयांना स्वतःचे हक्काचे घर होण्यासाठी अत्यल्प दरात निंबाळक येथे छोटे प्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मढीच्या कानिफनाथ देवस्थानचे सहसचिव शिवजीत व अॅड.प्रसाद डोके यांच्या संकल्पनेतून आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या निमित्त आयोजित एका कार्यक्रमात आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते लाभार्थी नागरिकांना जागा खरेदी खताची फाईल देण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, नव नागपूरचे सरपंच दत्ता सप्रे, अॅड.आर.टी.शर्मा, दिलीपराव मिस्कीन आदींसह नागरिक उपस्थित होते.

आ.संग्राम जगताप म्हणाले, नगर शहरातील उपनगरे चहूबाजूंनी झपाट्याने वाढत आहे. शहरात जागेचे भाव आकाशाला बिडलेले आहेत. मात्र डोके कुटुंबीयांनी सर्वसामान्य कुटुंबाना परवडतील अशा अत्यल्प दरात स्वतःच्या घरासाठी जागा देवून वेगळा आदर्श निर्माण करत नवा पायंडा पाडला आहे. त्यांचा हा उपक्रम गरिबांचे स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती करणारा आहे. स्व.बलभीम डोके यांचा समाजसेवेचा वारसा शिवजीत व प्रसाद डोके उत्कृष्टपणे पुढे चालवत आहेत. निश्चितच हा उपक्रम इतरांना प्रेरणा देणारा ठरेल. केंद्र सरकारची जशी घरकुल योजना आहे तसा डोके परिवाराचा हा उपक्रम उपयुक्त आहे.

      चंद्रकांत गाडे म्हणाले, वनश्री से.बलभीम डोके यांनी आयुष्यभर झाडांची व समाजाची सेवा केली. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेने शिवजीत व अॅड.प्रसाद डोके या बंधूंनी गरजूंना मदत करून स्व.डोके अण्णांचा वारसा पुढे चालवला आहे. त्यांच्या या उपक्रमा मुळे त्यांना गरिबांचे आशीर्वाद मिळतीलच पण परमेश्वाराचीही आशीर्वाद मिळतील.

      प्रास्ताविकात शिवजीत डोके म्हणाले, गेल्या ३० वर्षापासून डोके परिवार बांधकाम क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत काम करत आहे. ज्या व्यवसायात आपण काम करतो त्याचा सर्वसामान्यांना काहीतरी उपोयोग झाला पाहिजे या दृष्टीने आमचे वडील स्व.बलभीम डोके व आई स्व.उषादेवी डोके यांच्या स्मरणार्थ गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या गरजू कुटुंबियांना अत्यल्प दरात घर बांधण्यासाठी जागा दिली आहे. निंबळक येथे सर्व जाती धर्मामधील ४० परिवारांना घर बांधण्यास केवळ ८० हजारात एक गुंठा जागा दिली आहे. भविष्यातही बलभीमराव डोके डेव्हलपर्सच्या माध्यमातून असे अनेक सामाजिक उपक्रम राबवणार आहोत.

      यावेळी अॅड.आर.टी.शर्मा, दत्ता सप्रे आदींची शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. अॅड.प्रसाद डोके यांनी सूत्रसंचालन करताना उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त अॅड.विक्रम वाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा.संजय अनभुले, दिलीप मिस्कीन, धनंजय गाडे, अभयसिंह डोके, रेखा डोके, पूनम डोके, दीप डोके, अमरसिंह डोके, उत्कर्ष डोके आदींसह विविध क्षेत्रातिल नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here