७५२ जी मार्गावरील बेटातील पुलाला गुरु शुक्राचार्याचे नाव देणार -आ. आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या लगत असणाऱ्या बेट भागाच्या विकासासाठी निधी देवून बेटातील देवस्थान विकासासाठी देखील निधी दिला असून शुक्लेश्वर बेटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २ कोटीचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केलेला आहे. लवकरच या प्रस्तावास मंजुरी मिळणार असून कोपरगाव शहराच्या जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी वरील पुलाला गुरु शुक्राचार्याचे नाव देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

ऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेल्या कोपरगाव मतदार संघात देशातील एकमेव असलेले श्री शुक्लेश्वर देवस्थान कोपरगाव शहरातील बेट भागात आहे. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. गुरु शुक्राचार्य व या शुक्लेश्वर देवस्थानची संपूर्ण माहिती असलेले मराठी भाषेतील पुस्तक श्री शुक्लेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी यापूर्वीच लिहिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांपर्यंत गुरु शुक्राचार्य व या शुक्लेश्वर देवस्थानची महती पोहोचण्यात मोठी मदत झालेली आहे. त्यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषेत अनुवाद करून ‘शुक्रतीर्थ’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यामुळे निश्चितपणे गुरु शुक्राचार्य व या शुक्लेश्वर देवस्थानची महती साता समुद्रापार पोहोचणार असून कोपरगावचे नाव या निमित्ताने जगाच्या नकाशावर येणार आहे. हि सर्व कोपरगावकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी सुविधा मिळाव्या व देवस्थानचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी २ कोटीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून प्रस्ताव मंजुरी नंतर होणाऱ्या विकासातून भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होवून भाविकांची संख्या देखील वाढणार आहे. गुरु शुक्राचार्य व या शुक्लेश्वर देवस्थानच्या माहितीचा वेगाने प्रसार होण्यासाठी कोपरगाव रेल्वे स्थानक या ठिकाणी जाहिरात फलक लावण्यासाठीची परवानगी देखील रेल्वे विभागाकडून मिळविली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी श्री शुक्राचार्य महाराजांची आरती करून मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी परमपूज्य श्री परमानंद महाराज, परमपूज्य श्री राघवेश्वर महाराज, महानंदाचे चेअरमन राजेश परजणे, मा. आ. सौ. स्नेहलता कोल्हे, देवस्थान ट्रस्टचे सदस्य अॅड. संजीव कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, सुहास कुलकर्णी, मंदिर कमिटी अध्यक्ष सचिन परदेशी, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, डॉ. दत्तात्रय मुळे, अॅड. आर.टी. भवर, डॉ. क्षीरसागर, अॅड. नितीन भवर, दिपक विसपुते, सुशांत घोडके, ट्रान्सलेटर आदिती आव्हाड, डिझायनर ओंकार आव्हाड, मुद्रक सागर सोनवणे, मंदिर कमिटीचे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here