0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                समाजाच्या चांगल्या कामासाठी राजकारणातून विरोध केला जात नाही.धोरणात्मक निर्णय घेतले तरच गावाचा विकास होतो.विकास कोणत्याही एकट्या व्यक्तीचा नसतो.त्यास सर्वाचा हाथ असतो.विकासाला चांगल्या स्थापत्य अभियंत्याची गरज असते.असे प्रतिपादन माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी केले.

            देवळाली प्रवरा नगर पालिकेचे स्थापत्य अभियंता सुरेश मोटे यांच्या सेवानिवृत्त निमित्त आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन माजी आ.कदम बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी अजित निकत, माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे,माजी नगरसेवाक शिवाजीराव मुसमाडे,प्रकाश भुजाडी, अजिज शेख,मच्छींद्र कदम,सुभाष घोरपडे,बन्सी वाळके,गिताराम मोरे,विष्णू चव्हाण,दत्ताञय मोरे,सुभेदार शेख,मनोजकुमार पापडीवाल,सुदर्शन जवक,दिपक ञिभुवनआदी उपस्थित होते.

              यावेळी बोलताना माजीआ. कदम म्हणाले की,विकास करुन घ्यावा लागतो,नाहीतर घडवून आणावा लागतो.अधिकारी व पदाधिकारी हि रथाची दोन चाके आहेत.ती एक विचाराने चालली तरच गावाचा विकास होतो.नगर पालिकेत विकास करताना कोणतीही अडचण येवू दिली नाही.श्रीमंती आणायची असेल तर रस्ते चांगले पाहिजे.नगर पालिकेने अनेक बक्षिसे मिळविली.विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे.समाजाच्या चांगल्या कामासाठी राजकारणातून विरोध केला जात नाही.धोरणात्मक निर्णय घेतले तरच गावाचा विकास होतो.विकास कोणत्याही एकट्या व्यक्तीचा नसतो.त्यास सर्वाचा हाथ असतो.विकासाला चांगल्या स्थापत्य अभियंत्याची गरज असते.असे माजी आ.कदम यांनी सांगितले.

         यावेळी मुख्याधिकारी अजित निकत म्हणाले.कामगारांना नागरीसेवेसाठी 365 दिवस काम करावे लागते.गावाची प्रजा चांगली असेल तर राजा चांगला असतो.देवळाली प्रवराच्या विकासात कोणीही आडकाठी आणत नाही.विकासामुळेच वाड्या वस्त्यावर डांबरी रस्ते झाले आहेत.चांगला स्थापत्य अभियंता असेल तर प्रत्येक योजना लाभार्थ्यां पर्यंत पोहचवता येतात.असे मुख्याधिकारी निकत यांनी सांगितले.

                यावेळी सेवानिवृत्त स्थापत्य अभियंता सुरेश मोटे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, 1993 मध्ये नगर पालिकेत दाखल झालो.पायाभुत कामे करण्याची संधी मिळाली.सर्वांच्या सहकार्यानेचांगले काम करता आले.मी कोणत्याही पक्षाचा दुष्टीकोण ठेवून काम केले नाही.केलेल्या कामातून समाधान मिळाले आहे.राहुरी नगर पालिकेत काम करण्याची संधी मिळाली.कोणतेही काम मना पासुन केले तरच समाधान मिळते असे मोटे यांनी सांगितले.

            यावेळी सुभेदार शेख,संभाजी वाळके,मनोज पापडीवाल,शिवाजीराव मुसमाडे,राजेंद्र जाधव, प्रकाश भुजाडी,दिपक ञिभुवन आदींचे भाषणे झाली.कार्यक्रमाचे सुञ संचालन मुकुंद ढुस यांनी केले तर आभार प्रदर्शन सुदर्शन जवक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here