RSS म्हणजे’21व्या शतकातील कौरव : राहुल गांधी

0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ’21व्या शतकातील कौरव’ असून त्यांचं आणि देशातल्या श्रीमंतांचं साटलोट असल्याची टीका राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान केली आहे.

सध्या ‘भारत जोडो’ यात्रा हरियाणा आणि पंजाबमधून निघाली असून यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, “कौरव कोण होते? मी तुम्हाला 21 व्या शतकातील कौरवांबद्दल सांगू इच्छितो. हे कौरव खाकी हाफ पँट घालतात, हातात काठ्या घेऊन शाखांचं आयोजन करतात. भारतातील दोन-तीन अब्जाधीश या कौरवांसोबत उभे आहेत.”

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा 2022 च्या सप्टेंबर महिन्यात केरळच्या तिरुअनंतपुरम इथून सुरू झाली. या पदयात्रेदरम्यान राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर सातत्याने टीकास्त्र सोडलंय.

राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसला ‘तुकडे तुकडे गँग’, ‘भीती आणि द्वेषाचं राजकारण’ करणारी संघटना असल्याचं म्हटलंय. त्यांनी संघाची तुलना इजिप्तमधील बंदी असलेल्या मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेशी केली. आता राहुल गांधींनी एवढी टीका करूनही आरएसएसने घेतलेल्या भूमिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here