अमित शाह यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग 

0

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं विमान गुवाहाटीमध्ये अचानक उतरवण्यात आलं. बुधवारी रात्री गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपिनाथ बोर्डोलोई विमानतळावर त्यांचं विमान उतरलं.  

अमित शाह आगरतळाला जात असताना खराब हवामानामुळे हा निर्णय घेण्यात आला. अमित शाह त्रिपुरामध्ये रथयात्रेची आरंभ करण्याच्या कार्यक्रमासाठी तसेच प्रचारमोहीम सुरू करण्यासाठी जात आहे.गुवाहाटीला विमान उतरल्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आगरतळा येथे जात होते. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे त्यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. ते आजची रात्र गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे राहणार आहेत. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आगरतळा दौऱ्यावर जात आहेत. भाजपाने त्रिपुरात रथयात्रेचं आयोजन केलं आहे. याच रथयात्रेचं उद्घाटन करण्यासाठी अमित शाह गुरुवारी सकाळी आगरतळाला रवाना होणार आहेत.