बुधवारी सकाळी 11 वा रविंद्र मोरेसह कार्यकर्ते मुळा धरणात घेणार जलसमाधी
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी ४० हजार रूपयांची मदत २० डिसेंबर अखेर जमा करावी, अन्यथा २१ डिसेंबरला राहुरीच्या मुळाधरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.अल्टीमेट संपली आहे सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार देण्याच्या मनस्थितीत नाही.आम्ही शासनास दिलेला इशारा बुधवारी सकाळी ११ वा. राहुरीच्या मुळाधरणात जलसमाधी घेवून पुर्ण करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि मोरे यांनी सांगितले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राहुरी तहसीलदार फसिओद्दीन शेख यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून ११ सप्टेंबरला पंचनामे पुर्ण केले होते. मात्र ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान होऊन देखील जिल्ह्यातील शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाई यादीत आलेला नाही. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याने शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्याची गरज आहे.
अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले होते २० डिसेंबरपर्यंतचे अल्टीमेट देण्यात आली होती. नगर जिल्ह्यातील शेतपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी ४० हजार रूपयांची मदत द्यावी, शासनाने अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी ४० हजार रुपये जमा केले नाहीत.शासन वेळ काढूपणा करत आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अल्टीमेट देण्यात आला होता. पण शासनाला जर जाग येत नसेल आणि आम्हाला जलसमाधी घेताना पहायचे असेल त्यामुळे बुधवारी सकाळी 11 वा. राहुरीच्या मुळाधरणात जलसमाधी घेणार आहे. राहुरीचे तहसिलदार एफ. आर. शेख यांच्या समवेत मंगळवारी बैठक झाली परंतू सकारत्मक तोडगा निघाला नसल्यामुळे आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत.या बैठकीस रविंद्र मोरे, शिवसेनेचे ठाकरे गटाचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,जुगल गोसावी, योगेश करपे, सुनिल इंगळे, किशोर मोरे, सतिष पवार, प्रविण पवार, प्रमोद पवार, सचिन पवळे, संदिप शिरसाठ, प्रसाद धुमाळ, बाळासाहेब निमसे,ज्ञानेश्वर निमसे, कैलास गोसावी आदी उपस्थित होते.