देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याच्याकडून बळजबरीने चोऱ्या करुन घेवून अल्पवयीन मुलास उपाशी ठेवून मारहाण करणाऱ्या महिलेच्या ताब्यातुन अल्पवयीन मुलाची सुटका करुन राहुरी फँक्टरी येथील रेखा शरद पवार या महिलेस अपहणप्रकरणी अटक,तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी. याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली देवळाली प्रवरा ता.राहुरी येथिल एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झालेबाबत मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस स्टेशनला दिनांक 23 जानेवारी रोजी गुरनं. 43/2025 कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहरण झालेल्या मुलाचा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांना शोध घेतला असता गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीवरून रेखा शरद पवार हिने अपहरण केल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन रेखा शरद पवार हिस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत व अहिल्यानगर जिल्ह्यात मोटरसायकल चोऱ्या करण्याकरीता अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आल्याची कबुली रेखा पवार हिने दिली.
अपहरणानंतर अल्पवयीन मुलाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्या करण्यासाठी वापर करण्यात आल्याचे आरोपीने सांगितले.अल्पवयीन मुलाच्या आईच्या फिर्यादीवरुन रेखा शरद पवार हिच्या विरोधात अपहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.रेखा पवार हिला राहुरी न्यायालयात केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनविण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोउपनि. धर्मराज पाटील, महिला पोउपनि. ज्योती डोके, सफौ. तुळशीराम गीते, पोहेकॉ. संदीप ठाणगे, पोहेकॉ. बाबासाहेब शेळके, पोना. प्रवीण अहिरे, पोना. प्रवीण बागुल, पोकॉ. गणेश लिपणे, पोकॉ. जयदीप बडे, पोकॉ. सचिन ताजने यांच्या पथकाने केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोकॉ. गणेश लिपणे, महिला पोहेकॉ. स्वाती कोळेकर, महिला पोकॉ. मीना नाचन हे करत आहेत.
अशा प्रकारच्या अल्पवयीन मुलां, मुलींना पळून आणून त्यांच्याकडून चोऱ्या, किंवा इतर काही कृत्य करून घेत असल्याची माहिती असल्यास पोलीस स्टेशनला संपर्क करावा. असे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.