अवगुण सोडून सद्गुण धारण करणे हिच गुरुदक्षिणा – सरला दीदी

0

कोपरगाव : संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रजापती ब्रह्मकुमारी अध्यात्मिक केंद्र,कोपरगाव च्या सरला दीदी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शाहिद जवान सुनील वल्टे यांच्या पत्नी मंगल वल्टे व संदीप भाई उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे,उप मुख्याध्यापिका वैशाली लोखंडे व शिक्षिका ऋतुजा कुलकर्णी  यांच्या हस्ते अध्यक्ष व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

अवगुण सोडून सद्गुण धारण करणे हिच गुरुदक्षिणा गुरुपौर्णिमेला आपल्या शिक्षक रुपी गुरूंना द्यावी. आपल्या जीवनात विद्यार्थी दशेत असतांना अभ्यासकडे व मैदानी खेळाकडे लक्ष केंद्रित करावे.तसेच आपल्या आई वडिलांचा व शिक्षकांचा आदर करावा व मोबाईल पासून दूर राहावे. वाईट गुणांचा त्याग करून चांगले गुण अंगीकारावे असे मोलाचे मार्गदर्शन सरला दीदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना केले. विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत अशीर्वाद घेतले.  शाळेत आयोजित गुरुपौर्णिमेच्या या कार्यक्रमात इयत्ता दहावीतील विद्यार्थिंनी प्रभज्योतकौर नूरी,अदिती बारहाते व गायत्री कदम यांनी गुरुपौर्णिमेच्या विषयावर भाषण केले. सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी श्रद्धा शिंदे व जोया शेख यांनी केले तर आभार प्राची पहिलवान व शिक्षिका संगीता गाडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here