मयूर भोसले यांचे कार्य उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी
जामखेड तालुका प्रतिनिधी – अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय जामखेड ची नोंद झाली आहे हा उपक्रम २६ जानेवारी २०२४ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त घेण्यात आला होता
जगातील सर्वात मोठे मानवी रचनेतील भारताच्या नकाशाची प्रतिकृती रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये साकार झाले आहे. यामध्ये २५०० विद्यार्थी व १७ महाराष्ट्र बटालियनची एन.सी.सी. कॅडेट सहभागी झाले त्याचे मोजमाप लांबी २४० फुट रुंदी २२५ फूट आहे. २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालय परिसरात साकारले कलाशिक्षक तथा एन.सी.सी. ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी ते साकारले.
अशिया बुक ऑफ रेकॉर्डने १९मार्च २०२४ रोजी निश्चित केले आहे. अशी नोंद वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी सलग्न अशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. यानिमित्त कोठारी प्रतिष्ठानचे चे अध्यक्ष संजय कोठारी यांनी सन्मान केला यावेळी प्रमुख उपस्थिती पत्रकार ओंकार दळवी ,पत्रकार समीर शेख आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले या वर्ल्ड रेकॉर्ड निमित्त जामखेड तालुका व अ. नगर जिल्ह्याचे नाव जगात चमकले आहे. तसेच मयूर भोसले हे विविध उपक्रम घेऊन जामखेड तालुक्याचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करत असतात जागतिक उपक्रमामुळे जामखेडच्या वैभवात भर पडली आहे असे मनोगत व्यक्त केले