अश्वमेधचे कांदा साठवणुकीसाठी महत्त्वपूर्ण योगदान – डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे

0

भारताच्या कांदा साठवणुकीतील आव्हानं आणि त्यावरील अभिनव उपाय

कोपरगाव : भारतामध्ये कांदा साठवताना मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, कुजणे, पाणी सोडणे आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव या समस्या शेतकऱ्यांसाठी गंभीर बनल्या आहेत. मागील तीन दशकांपासून शेतकरी बाजारात उपलब्ध असलेल्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा उपयोग करत होते. मात्र, यामुळे कांद्यावर रासायनिक अवशेष राहून आरोग्यास व पर्यावरणास धोका निर्माण होत होता.

अश्वमेधचा संशोधन प्रवास आणि डेसिकेटरचे योगदान या समस्येवर पर्यावरणपूरक उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीड रोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी 2008 मध्ये “अश्वमेध” प्रकल्पांतर्गत संशोधन सुरू केले.

 

2012 मध्ये निवडक अनुभवी शेतकऱ्यांना “डेसिकेटर” उत्पादनाचा प्रथम प्रात्यक्षिक प्रयोग देण्यात आला.,2016 मध्ये राष्ट्रीय कांदा संशोधन केंद्र (NHRDF) सोबत करार करून वैज्ञानिक चाचण्या करण्यात आल्या. या संशोधनानुसार, डेसिकेटरच्या वापरामुळे कांदा कोरडा राहतो आणि साठवणीतील नुकसान कमी होते.

“अश्वमेध” ने भारतातील कांदा साठवणीला पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध करून दिला आहे. डेसिकेटरमुळे कांदा विषमुक्त राहतो, जास्त काळ टिकतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान टळते!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here