अहिल्यादेवीनगर नामांतराबाबत राज्य सरकारने ठोस भुमिका घ्यावी

0

उत्कर्ष फौंडेशनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

     नगर – पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर वधू-वर सूचक मंडळ व उत्कृर्ष फौंडेशन यांच्यावतीने अहिल्यानगर नामांतरासत विरोध करुन याचिका दाखल केली असून, याबाबत राज्य शासनाने सक्षमपणे बाजू मांडावी, अशा आशयाचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना देण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.अशोक भोजणे, सचिन चितळकर, सुमित कुलकर्णी, राजेंद्र पाचे, चंद्रकांत तागड, राजेंद्र नजन आदि उपस्थित होते.

     या निवेदनात म्हटले आहे की, 31 मे 2023 रोजी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे व अहिल्याबाई होळकरांचे वंशज आ.प्रा.राम शिदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडी येथे नामांतराची घोषणा केली आहे. यानंतर प्रशासकीय पातळीवर सर्व सोपस्कर पार पाडले. राज्य शासनाने याबाबत केंद्र सरकारकडे ठराव पाठविला आहे. मात्र याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. 27 जूनला प्राथमिक सुनावणी झाली असून, याबाबत केंद्र सरकार राज्य, नाशिक विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले.

     तरी अहिल्यादेवी यांचे जन्मगांव असलेल्या व देशातील एकमेव नव्याने निर्माण झालेल्या जिल्ह्याच्या नामातराबाबत राज्य सरकारने सकारात्मक बाजू मांडवी, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.

     यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यादेवीनगर नामांतराबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, त्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.  यावेळी ना.अजित पवार यांचा काठी, घोंगडं व अहिल्यादेवी होळकरांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here