आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला : चारुदत्त सिनगर

0

कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील सर्वच समाज घटकांच्या विकासाच्या अडचणी सोडवून सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करून दाखवत आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकला असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी म्हटले आहे.

कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागात तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी आ. आशुतोष काळेंच्या प्रचारार्थ घोंगडी बैठका घेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदार संघाच्या विकासाच्या बाबतीत पाच वर्षात झालेला बदल नागरिकांच्या समोर मांडला. ते म्हणाले की, आ.आशुतोष काळे यांच्याकडे मतदार संघाच्या विकासाची सूत्रे सोपवीतांना मतदार संघातील नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. याची त्यांनी जाणीव ठेवून या पाच वर्षांत रस्ते, वीज, पाणी, आरोग्य हे मुलभूत प्रश्नच तर सोडवीलेच आहेत. त्याचबरोबर असे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी न सांगता देखील सोडविले आहे. यावरून त्यांच्याकडे असलेल्या विकासाच्या दूरदृष्टीची कल्पना येते त्यामुळे येणाऱ्या काळात देखील मतदार संघाचा असाच विकास होत राहील याबाबत शंकाच नाही.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच आ.आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित झालेली होती. त्यामुळे अनेक कार्यक्रमाच्या माध्यामातून तसेच त्यांचा नागरिकांशी  सततचा संपर्क असल्यामुळे चर्चा आणि संवादातून मतदार संघातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विकास पोहोचला आहे आणि आ.आशुतोष काळे देखील पोहचले आहे. मतदार संघातील सर्व भागांमध्ये जात असतांना त्यांना नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त  प्रतिसाद हि त्यांच्या विकास कामांची पावती आहे.

कोपरगाव मतदार संघाच्या विकासाचे अनेक प्रश्न होते.या सर्व प्रश्नांची अचूकपणे सोडवणूक करतांना मतदार संघाच्या विकासाच्या बाबतीत स्वप्नवत कायापालट करण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. मतदार संघातील प्रत्येक जाती धर्माच्या सभागृहासाठी त्या त्या समाजाच्या मागणीनुसार निधी देवून अनेक समाजाची सामाजिक सभागृह, वॉल कंपाउंड त्यांनी उभे केले आहेत. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांच्या कामगिरीवर मतदार संघातील प्रत्येक समाज घटक खुश असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व समाज आ.आशुतोष काळेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here