आ. आशुतोष काळेंच्या सुचनेनुसार मोहिनीराजनगर स्मशानभूमीत जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण

0

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून बेट भागातील स्मशानभूमीच्या नूतनीकरणासाठी ५८ लक्ष रुपये निधी दिला आहे. त्या कामा अंतर्गत या या ठिकाणी अंत्यसंस्कार करतांना अडचणी येवू नये यासाठी जाळ्या बसविण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार सदरच्या स्मशानभूमीमध्ये जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

सदरच्या पूर्ण झालेल्या कामाची सचिन परदेशी, राजेंद्र जोशी, बाळासाहेब बारसे, विलास आव्हाड, राहुल आव्हाड, निलेश पाखरे यांनी पाहणी केली. अंत्यसंस्कार करतांना येणाऱ्या अडचणी ओळखून आ. आशुतोष काळे यांनी तातडीने कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्यामुळे जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण झाले त्याबद्दल बेट-मोहनीराजच्या नागरिकांच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here