आ. आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार न. पा कडून आयोध्यानगरमध्ये नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु

0
फोटो ओळ - आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेकडून अयोध्यानगर भागात पाईपलाईन टाकण्याच्या कामास प्रारंभ.

अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी, नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळेंचे आभार

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या हद्दवाढीतील अयोध्या नगर व परीसरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे आ. आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला तातडीने हि समस्या सोडविण्याची सूचना केली होती. त्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेकडून अयोध्यानगर भागात आजपासून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु  करण्यात आले आहे.  

कोपरगाव शहराच्या हद्दवाढीतील अयोध्या नगर व परीसरामध्ये मागील अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. त्याबाबत नागरिकांनी अनेक वेळा कोपरगाव नगरपरिषदेकडे लेखी निवेदन देवून हि समस्या दूर करण्याची मागणी केली होती. मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे या नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे आ. आशुतोष काळे यांच्याकडे आपली समस्या मांडली होती. नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळयाच्या पाणी प्रश्नाची आ. आशुतोष काळे यांनी दखल घेत कोपरगाव नगरपरिषदेला सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेने अयोध्यानगर भागात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु केल्यामुळे नागरिकांना न्याय मिळाला आहे. आमच्या मागणीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांच्यामुळे तातडीने पाईप लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अयोध्यानगर भागातील नागरिकांचा मागील अनेक वर्षापासूनचा प्रश्न सुटणार असून नागरिकांना पाणीपुरवठा होणार आहे व नागरिकांची विशेषत: महिला भगिनींची वणवण थांबणार आहे. त्यामुळे अयोध्यानगर भागातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

यावेळी माजी नगरसेवक दिनकर खरे, राजेंद्र खैरनार, संदीप कपिले, सचिन गवारे, विक्रम मांढरे, शैलेश साबळे, निलेश रुईकर, किशोर डोखे, किरण बागुल, मिलिंद सरोवर, संजय मोरे, सतिश गायकवाड, दिनेश गायकवाड, राम बढे, पंढरीनाथ मते, राजेंद्र बढे, राहुल बढे, शाम बढे, विशाल राजगिरे, मयुर सोरवर, दिनेश सरोवर, राहुल कांडेकर, अमोल दवंगे, अजय कठाळे, शशिकांत सरोवर, संतोष कांडेकर, दत्तू कांडेकर, गणेश कांडेकर, मुकेश राजगिरे, सुखदेव बढे, रवी सरोवर, दिपक गायकवाड, प्रकाश गायकवाड, किरण गायकवाड, सर्जेराव गायकवाड, अमोल गायकवाड, सचिन वंडागळे, बाळासाहेब दहे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here