कोपरगाव (प्रतिनिधी) कोपरगाव विधानसभेच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे हे जवळपास सव्वा लाखाच्या मताधिक्याने लीड घेत विजयी झाले. 85 हजाराच्या वरती लीड द्या आशुतोष काळे यांना मंत्रीपद देतो असे विधान प्रचार सभेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. अगदी त्याचप्रमाणे आशुतोष काळे यांचा भरघोस मताने विजय झाला. आता त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून कोपरगाव तालुक्यात ठीक ठिकाणी देव देवतांना साकडे घालण्यात येत आहे.
काल देर्डे चांदवड येथे ग्रामस्थांकडून गावातील ग्रामदैवताच्या व प्रभू रामचंद्राच्या साक्षीने महादेवाला संध्याकाळी दुग्धाअभिषेक करून आमदार आशुतोष दादांना महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात वणीॅ लागावी असे साकडे घातले.यावेळी देर्डे चांदवड गावतंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी होन ,संजुभाऊ शितोळे, माजी सरपंच आशोकराव होन,प्रितम मेहेत्रे, बाबासाहेब देशमुख, देर्डे चांदवड दुध डेअरी अध्यक्ष पोपटराव होन अदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.