आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करण्यात आल ; सत्यजीत तांबेंच मोठ विधान

0

संगमनेर : चंद्रकांत शिंदे

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून बंडखोरी करणारे काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या अपक्ष उमेदवारीवरून झालेल्या राजकारणावर मोठ वक्तव्य केल आहे.आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करण्यात आल असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. तसेच किती राजकारण असत हे सर्वांनी मागील चार-पाच दिवसात टीव्हीवर पाहिलच आहे, अस सूचक विधान करत आम्ही त्यावर योग्यवेळी योग्यरितीने बोलूच, असा इशारा त्यांनी दिला. ते बुधवार दि. १८ जानेवारी रोजी नाशिकमध्ये एका सभेत बोलत होते.

        सत्यजीत तांबे म्हणाले, मी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे सर्व शिक्षक, पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यावेळी आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करण्यात आल, तेव्हा कपिल पाटलांनी आम्हाला स्वतः फोन करून पाठिंबा दिला. अशा काळात कपिल पाटील आणि शिक्षक भारती आमच्या मदतीला धावून आली. हे मी कदापि विसरू शकणार नाही.गेले २२ वर्षे मी संघटनेच्या माध्यमातून राज्यात आणि देशात काम केल.मला खात्री आहे की, मी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करेन. गेली २२ वर्षे मी संघटनेच्या माध्यमातून राज्यात आणि देशात काम करत आहे. मी २००० मध्ये एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून कामाला सुरुवात केली. पुढे मी १० वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केल. त्यानंतर मी युवक काँग्रेसमध्ये काम केल. युवक काँग्रेसचा राज्याध्यक्ष म्हणून चार वर्षे काम केलं, असेही सत्यजीत तांबे यांनी यावेळी सांगितले.

सत्यजीत तांबे पुढे म्हणाले, देशातील अस एकही राज्य नाही जिथं मी काँग्रेस पक्षाच संघटनात्मक काम केलं नाही. राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं मी काँग्रेसच संघटनात्मक काम केल नाही. युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना चांद्यापासून बांद्यापर्यंत मी मित्र जमवण्याचं काम केल. अनेक सामाजिक, राजकीय संस्था, संघटनांवरही मी काम करतो आहे. म्हणूनच कपिल पाटील यांच्या मनात मला पाठिंब्याच गेल्या अनेक वर्षांपासून होत. खरतर कपिल पाटील माझ्यासाठी विधानसभा मतदारसंघ शोधत होते. आमची अनेकवेळा चर्चा व्हायची. ते म्हणायचे तू या मतदारसंघातून उभ राहण्याचा प्रयत्न कर, तू तिथून उभ राहण्याचा प्रयत्न कर. परंतू राजकारण असत. ते किती असत हे सर्वांनी मागील चार-पाच दिवसात टीव्हीवर पाहिलच आहे. खूप राजकारण झाल आहे. आम्ही त्यावर योग्यवेळी योग्यरितीने बोलूच. सध्या मी राजकारणावर बोलणार नाही, असंही सत्यजीत तांबेंनी नमूद केल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here