आमदार काळे यांचे पाप शहराला भोगावे लागते आहे – दत्ता काले

0

कोपरगाव : कोपरगाव शहारला गढूळ पाणी देऊन जनतेला आंदोलनाची नौटंकी करून फसवणारे आमदार आशुतोष काळे M L A Ashutosh Kale आणि त्यांचे बगलबच्चे यांच्यात समन्वय नाही हे उघड झालं आहे. स्वतःचे पदाधिकारी हे आमदार काळे हे सत्तेवर आहे तर जाब कुणाला विचारत आहेत हा प्रश्न शहराला पडला आहे.अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कृष्णा आढाव यांनी कोल्हेंवर टीका करण्याइतपत त्यांची पात्रता नाही.आमदारांनी नैतिकता स्वीकारून शहराला स्वच्छ पाणी मिळवून देणे त्यांचे कर्तव्य आहे त्या विरोधात तुम्ही आंदोलन करने हे तू मारल्या सारखे कर मी रडल्या सारखे करतो ही काळे गटाची गत आहे अशी खरमरीत टीका भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले Datta Kale यांनी केली आहे.

कोपरगाव शहरात खोट्या वल्गना करून पालिका अंतर्गत येणाऱ्या निधीवरही प्रसिद्धीचा डल्ला मारणाऱ्या काळे यांचे आज तागायात एकही ठोस काम जनतेत नाही.कोट्यावधी आले तर गेले कुठे ? केवळ स्विय्य सहाय्याकाचा विकास घडून येऊन मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याची जोरदार चर्चा शहरात घरा घरात आहे.”टक्के घेतो जोरात आणि पत्र देतो दिवस भरात” अशी अवस्था सुरू असून या टक्केवारी पद्धतीतून खुद्द जुने जाणते निष्ठावंत देखील सोडले जात नाहीत अशी अवस्था काळे गटाची झाली आहे असे त्यांचेच कार्यकर्ते खुलेआम चर्चा करतात.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण कोणी केले नाही हे जगजाहीर आहे.कोल्हे यांनी केलेल्या बसस्थानक,पोलीस स्टेशन,पंचायत समिती इमारत कामांचे लोकार्पण मंत्र्यांच्या हस्ते करताना त्यात आपले कवडीचेही योगदान नाही याची जाणीव काळे यांना उरली नसावी.४२ कोटी पाणी योजना अंतिम चाचणी झाल्याशिवाय बिले अदा करू नये असे कोल्हे गटाने सांगूनही कुणाच्या दबावाने ते बिल अदा केले गेले हे उघड आहे.त्यामुळे त्यावर बोलण्याचा कवडीचा अधिकार काळे आणि चेल्याना नाही.कृष्णा आढाव यांना कोल्हे यांनी कशी मदत वेळोवेळी केली आहे हे काळे यांनी त्यांना खाजगीत विचारावे. त्यामुळे आपली पात्रता पाहूनच बोलावे असे खरमरीत उत्तर काले यांनी दिले आहे.

देर आहे दुरुस्त आए, निदान कोल्हे यांनी स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रयत्न केले होते. ग्रामीण भाग आणि शहर यात संभ्रम पसरवून स्वच्छ पाणी घालवले. तुम्ही पाणी प्रश्नात न्यायालयातून आडवे येत शहराला त्रास दिला. हे आता तुमच्याच कार्यकर्त्यांनी उघड केले आहे. साठवण तलावाचे भांडवल करून काही अर्थ नाही कारण त्या जागाच मुळात स्व. शंकरराव कोल्हे यांनी जमीन मालकांना कारखान्यात नोकरी देऊन शहरासाठी घेतल्या होत्या हे माहीत नसणारे अडाणी कार्यकर्ते काळेना घरचा आहेर रोजच आपल्या भूमिकेतून देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here