आशाताई फटांगरे जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका 

0

कोपरगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोपरगाव तालुका आरोग्य विभाग पंचायत समिती यांच्यावतीने जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेवका पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.  जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील आशा दिलीप फटांगरे यांना सन्मानित करण्यात आले. 

जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा गटप्रवर्तक म्हणून तृतीय क्रमांक अमृता योगेश गव्हाणे यांना मिळाला.तर राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम यशस्वी भूमिका बजावणाऱ्या रोहिणी नंदकिशोर चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप , गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले.यावेळीडॉ  कवडे,डाॅ श्रीमती पठाण , डॉक्टर श्रीमती कानडे,  डाॅ वाकचौरे,डाॅ मगर  अदी उपस्थित होते. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे आशाताई फटांगरे यांचे पोहेगांव परिसरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here