अहमदनगर – आसाराम तुकाराम गोरे (वय ८३) रा. रुईछत्तीसी यांचे मंगळवार दिनांक २८/३/२०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेत ३६ वर्ष सेवा केली होती. विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात त्यांचा सहभाग होता. न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा. सुभाष गोरे यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली, तीन भाऊ, तीन बहिणी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.