उन्हाळ्यात पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळावे -विवेक कोल्हे

0

कोपरगाव प्रतिनिधी –

          चालु पावसाळी हंगामात उशीराने पर्जन्यमान झाल्याने गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांना रब्बी व उन्हाळ हंगामाच्या पाण्याच्या आवर्तनात योग्य नियोजन करून देण्यात येणारे आवर्तने पुरेसे क्षमतेने द्यावी म्हणजे त्यामुळे अधिकचे आवर्तन न लागता शेतक-यांच्या पाणीपटटीत बचत होईल. गोदावरी कालव्यांचे आर्युमान शंभर वर्षापेक्षा जास्त झाले असुन त्याच्या नुतणीकरणासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कालवा सल्लागार बैठकीत बोलतांना केली.

           जिल्हा सहकारी बँकेच्या राहाता शाखेतील सभागृहात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली बारमाही गोदावरी कालवे लाभधारक कालवा सल्लागार समितीचे बैठक नुकतीच पार पडली त्यात विवेकभैय्या  कोल्हे बोलत होते. तुटीच्या गोदावरी खो-यात पश्चिमेचे समुद्राला अतिरिक्त वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळवावे म्हणून माजमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी विधीमंडळात मंजुरी घेतली असुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कृष्णा खो-याप्रमाणे कार्यक्रम राबवुन नगर नाशिकसह मराठवाडयाच्या प्रादेशिक पाणीवादात शेतक-यांना न्याय द्यावा असेही ते म्हणांले.

         विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, उन्हाळयात तीन आर्वतने दिली तर शेतक-यांना रब्बी हंगामाची ८ हजार ५०० रूपये पाणीपटटीचा भुर्दंड पडतो, तेंव्हा आहे त्या पाण्यांच्या दोन आर्वतनांत बचत करून तिसरे उन्हाळ पाण्यांचे आर्वतन दिल्यास शेतक-यांच्या पाणीपटटीत ३ हजार ५०० रूपयांची बचत होणार आहे, उन्हाळ हंगाम आर्वतनाचा कालावधी वाढवावा. कालवा आर्वतन सोडण्यापुर्वी ज्या चा-या, उपचा-या आहे त्याची दुरूस्ती करावी. 

            गोदावरी कालवे नुतणीकरणाचा प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे. उजव्या कालव्यासाठी १९१ कोटींचा निधी मंजुर झाल्याचे समजले मात्र डाव्या कालव्यास अजुन निधीच मंजुर नाही तेंव्हा तो तातडीने उपलब्ध व्हावा. 

          शेजपाळी पाण्यांचे रजिष्टर अद्यावत ठेवले जावे, आर्वतन काळात नाशिक पाटबंधारे अंतर्गत जलसंपदा खात्याचा कर्मचारी वर्ग अपुरा असल्यांने शेतक-यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो तेंव्हा हा कर्मचारी वर्ग तात्काळ भरला जावा, नांदुर मध्यमेश्वर ते हरिसन ब्रांच व हरिसन ब्रांच ते श्रीरामपुर असे दोन भाग या कालव्यास पडतात तेंव्हा हरिसन ब्रांच ते श्रीरामुपर टेल अशा पध्दतीने पाण्यांचे आर्वतन व्हावे जेणेकरून हरिसन ब्रांच धारक शेतक-यांच्या अडी अडचणी दुर होतील. 

           बिगर सिंचन पाण्यांचा भार दारणा गंगापुर धरण कार्यक्षेत्रावर वाढतो आहे त्याचा फटका बारमाही गोदावरी कालवे लाभधारकांना बसत आहे त्यासाठी पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे आणले जावे असे ते शेवटी म्हणाले.

           याप्रसंगी खासदार भाउसाहेब वाकचौरे, मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे,आ. आशुतोष काळे, आ. हेमंत ओगले, उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधिक्षक अभियंता राजेश गोवर्धने, नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सोनल शहाणे, उजव्या तट कालव्याचे उपअभियंता संभाजी पाटील, डाव्या कालव्याचे उपअभियंता संदिप पाटील, विविध सहकारी पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी, लाभधारक शेतकरी, सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आदि मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here