ऋषभ पंतला वाचवणाऱ्या बस ड्रायव्हरवर कौतुकाचा वर्षाव

0

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला भीषण अपघातामधून वाचवणाऱ्या हरियाणा परिवहन महामंडळाच्या बस चालक आणि वाहकाचा पानिपत डेपोकडून सत्कार करण्यात आला आहे.

सुशील मान आणि परमजीत सिंग अशी या दोघांनी नावे आहेत. दोघांनी पहाटे ऋषभ पंतला अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढत इतर लोकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

सुशील मान म्हणाला, “मी क्रिकेट पाहत नाही आणि मला माहित नव्हते की हा ऋषभ पंत आहे. पण माझ्या बसमधील इतरांनी त्याला ओळखलं.

“ऋषभला काढून टाकल्यानंतर आणखी कोणी आहे की नाही हे तपासण्यासाठी मी पटकन कारची झडती घेतली. मी कारमधून त्याची निळी बॅग आणि 7 ते 8 हजार रुपये काढले आणि त्याला अॅम्ब्युलन्समध्ये नेऊन दिले.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here