एक जानेवारीपासून या देशांमधून येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य

0

1 जानेवारीपासून, चीन, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपान येथून येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या कोविड-19 इतिहासासह स्वयं-घोषणापत्रासह RT-PCR नकारात्मक अहवाल अनिवार्यपणे अपलोड करावा लागेल.

यासोबतच त्यांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून सरकारी संस्था जेव्हा गरज असेल तेव्हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करू शकतील, अशा सूचना नागरी उड्डायन मंत्रालयानं विमान कंपन्यांना पत्र लिहून दिल्या आहेत. प्रवाशांनी कोव्हिड डिक्लेरेशन फॉर्म सादर केल्याशिवाय बोर्डिंग पास केले जाणार नाही याची खात्री करावी, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here