एक व्यक्ती आदर्श घडला तर परिसराचा कायापालट होतो – विवेक कोल्हे

0

– वाकडी येथे १००० विद्यार्थांना बुट आणि सॉक्स वाटप 

राहता : श्री गणेश विद्या प्रसारक मंडळाचे विद्यमाने श्री लक्ष्मीनारायण विद्यालय वाकडी व राजमाता माध्यमिक विद्यालय येथिल विद्यार्थ्यांना अलौकिक साई आस ट्रस्ट दिल्ली व अलोक मिश्रा यांच्या वतीने बुट व सॉक्स वाटप सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी मंचावर श्री गणेश कारखाना चेअरमन सुधीर लहारे,व्हा.चेअरमन विजय दंडवते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.नारायण कार्ले,डॉ.एकनाथ गोंदकर,सर्व संचालक,रोहिणी आहेर सरपंच वाकडी,ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी,वाकडी, जळगाव,ग्रामस्थ व शिक्षक,शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.

या वेळी बोलताना विवेकभैय्या म्हणाले की अलोक मिश्रा यांच्या माध्यमातून जवळपास 37 लाख 53 हजार एवढी मदत विद्यालयाला झाली आहे. दातृत्व करणारे अनेक मान्यवर हे पुढील पिढी घडण्यासाठी अपेक्षा ठेवतात.आपली जडणघडण होण्यासाठी शिक्षक आणि आईवडील यांचे मोठे योगदान असते.आपला भारत हा प्रगतीची शिखरे गाठत आहे मात्र शेजारील देश नागरीकांना अन्न धान्य देण्यासाठी हतबल झाले आहेत.कुठलाही देश आणि परिसर तेव्हा मोठा होतो जेव्हा विद्यार्थ्याची जडणघडण व्यवस्थीत होते.आपल्या परिसराला ओळख मिळाली ती साईबाबांच्या पावन भूमीमुळे, हे आपले भाग्य आहे.भविष्यात मदतीसाठी पुढे येणारे विद्यार्थी विद्यालयातूनही अधिक घडतील अशी आदर्श शिकवण देणारा संस्कार रुजतो आहे.

माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी गणेश बंधारे,विविध संस्था यांचे जाळे विणुन आपल्या परिसराला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले.एक व्यक्ती घडला तर परिसर घडतो.स्व.संदीप लहारे यांचे स्मरण या निमित्ताने होते.देशाभिमान निर्माण करून आदर्श युवक घडवण्यासाठी सर्वांचा हातभार आवश्यक आहे.भविष्यातील अब्दुल कलाम,किरण बेदी,सचिन तेंडुलकर यासारखे व्यक्तिमत्व घडतील यासाठी शुभेच्छा दिल्या. साई आस परिवार आणि अलोक मिश्रा यांचे कौतुक करत धन्यवाद दिले.

यावेळी बोलताना अलोक मिश्रा यांनी कमी वयात विवेक कोल्हे यांनी जनसेवेचा वसा चालविला आहे त्याबद्दल कौतुक केले. महाविद्यालयाच्या प्रगतीत आमचे कायम सहकार्य राहील.या भागात आल्यावर साईबाबा भेटल्यासारखे वाटते.विद्यार्थ्यांना होणारी मदत आणि आम्ही करत असलेले कार्य हे निमित्त मात्र आहे यासाठी असणारी प्रेरणा वाकडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये आमच्यासाठी साईबाबांचे रूप आहे असे मत व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थांना बुट आणि सॉक्स वाटप करण्यात आले.विविध क्षेत्रातील यश संपादन केलेल्या विद्यार्थी व सेवकांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here