एस.एस.जी.एम महाविद्यालयात रसायनशास्त्र राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

0

कोपरगाव प्रतिनिधी ; रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील सायनशास्त्र विभागांतर्गत “Current Advancement in Material Science and Green Chemistry” या विषयावर शनिवार ,दि.८ फेब्रुवारी २०२५ रोजी आभासी आणि प्रत्यक्ष प्रणालीद्वारे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले आहे.

सदर राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठलराव शिवणकर यांच्या उपस्थितीत होणार असून परिषदेसाठी प्रो. डी अशोक (आय.आय.सी.टी. हैदराबाद,तेलंगणा)., डॉ. उमेश क्षीरसागर (आय.आय.टी. इंदोर,मध्य प्रदेश)., डॉ. रमेश दातीर (जैन युनिव्हर्सिटी बंगलोर,कर्नाटक) व प्रो. डॉ. सतीश परदेशी (रसायनशास्त्र विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे,महाराष्ट्र) हे मार्गदर्शन करणार आहे. सदर परिषदेसाठी तरुण संशोधकांना वाव मिळावा म्हणून संशोधन पेपर सादरीकरण ठेवलेले आहे. सदर परिषदेसाठी संशोधकांकडून लेख मागविण्यात येणार आहे.

सदर पेपर नामांकित जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे. संशोधनाचे विषय खालील प्रमाणे आहे.
1.Green And Sustainable Chemistry
2.Advanced Material and Nanotechnology
3.Organic And Inorganic Synthesis
4.Catalysis And Reaction Engineering
5.Enviormental Science
खालील लिंकवर क्लिक करून परिषदेत आपला सहभाग नोंदवावा.सहभाग नोंदविण्याची अंतिम दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ सकाळी ९. वाजेपर्यंत लिंक – https://forms.gle/5BcfJVzZ3qqu7rGP9
पेपर पाठविण्यासाठी मेल आय डी- nationalconferencecamsgc2025@gmail.com

Whats up Group
https://chat.whatsapp.com/JXHPtX5iXmVEdHczy8taQj
तरी जास्तीत जास्त विषयतज्ञ व अभ्यासकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी केले आहे. या परिषदेचे मुख्य संयोजक प्रा. अरुण देशमुख (विभाग प्रमुख) व प्रो.डॉ. मोहन सांगळे (उपप्राचार्य विज्ञान शाखा) हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here