ऐतिहासिक लोकमान्य वाचनालयाच्या अध्यक्षपदी रमेश गुगळे

0

जामखेड तालुका प्रतिनिधी 

आज मोबाईल व सोशलमिडीयाच्या काळात पुस्तक व पेपर वाचनाची आवड लोकांच्या मनात निर्माण करणे व कायम ठेवणे हे धनुष्यबाण पेलण्यासारखे आव्हान आहे. गेली १३७ वर्षांपासून लोकमान्य वाचनालय जामखेडमध्ये वाचन जागृतीचे सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. या लोकमान्य वाचनालयाच्या माध्यमातून अनेक पिढ्या यशस्वी झाल्या आहेत. यापुढेही समस्त पूस्तक वाचनावर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या सहकार्याने हे आव्हान पेलू असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश गुगळे यांनी व्यक्त केले.

जामखेड शहरातील ऐतिहासिक असे १३७ वर्षांपासून वाचकांच्या सेवेत असलेल्या लोकमान्य वाचनालयाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत सर्वानुमते रमेश गुगळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच श्रीकांत होशिंग यांची सेक्रेटरी म्हणून तर अॅड. ओंकार मोरेश्वर देशमुख व अॅड. गणेश यशवंत कुलकर्णी यांची नुतन संचालक म्हणून निवड करण्यात आली.

लोकमान्य वाचनालयाची स्थापना १८८७ साली कै. मधूकरराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. १३७ वर्षे जूने असलेले लोकमान्य वाचनालय जामखेडचे वैभव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here