माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख
कडेगांव दि.3(प्रतिनिधी) : ज्या काळात ग्रामीण भागात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या काळात महाविद्यालयाने विद्यार्थीना प्रेरणा देऊन जीवन घडविले व आयुष्याची सुंदर इमारत उभी केली. अशा महाविद्यालयाच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी व माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख यांनी केले.
ते आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर येथे माजी विद्यार्थी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.लालासाहेब यादव हे होते. याप्रसंगी कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीशभाऊ देशमुख, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ॲड. जयवंतराव देशमुख, सुभाष घारगे व माजी विद्यार्थी मेळाव्याच्या समन्वयक प्रा.सौ. संगीता पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बापूराव पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून माजी विद्यार्थी मेळावा घेण्यामागील भूमिका स्पष्ट करून महाविद्यालय राबवत असणा-या शैक्षणिक उपक्रमांचा व भौतिक प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी अध्यक्षस्थावरुन बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष लालासाहेब यादव म्हणाले की,

यावेळी अध्यक्षस्थावरुन बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष श्री. लालासाहेब यादव म्हणाले की, ग्रामीण भागातील गोर-गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी अतिशय दुर्गम भागात शाळा, महाविद्यालये उभा करुन ग्रामीण भागातील युवकांना सक्षमपणे उभे केले. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र आले पाहिजे असे सांगून महाविद्यालयाच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे असेही ते म्हणाले. यावेळी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून देत शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष व महाविद्यालयातून मिळालेली प्रेरणा यामुळे आयुष्य घडल्याचे सांगितले. उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, रजिस्टार चंद्रकांत धोंडमणी, प्राचार्य डॉ. एल.जी जाधव, प्रा.डॉ. शिवाजीराव देशमुख, सौ.अस्मिता पवार, प्राध्यापिका सौ. वंदना पवार, प्रा.डॉ.अशोक तवर, ॲड. जयवंतराव देशमुख व कडेपूरचे सरपंच सतीशभाऊ देशमुख यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगून काळानुसार शैक्षणिक पद्धतीमध्ये कसा बदल होत गेला हे सांगून जागतिक दर्जाचे शिक्षण आपल्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात मिळाले पाहिजे अशा भावना व्यक्त करुन महाविद्यालयाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले.
प्रारंभी प्रा.डॉ.जयदीप दीक्षित यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा डॉक्युमेंटरी फिल्मच्या माध्यमातून सादर केला. प्रा.डॉ. अशोक तवर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ पंचवीस हजारांची ठेव ठेवून त्याच्या व्याजातून मराठी विभागामध्ये पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीस जाहीर केले. तर प्रा.डॉ. शिवाजी देशमुख यांनी ग्रंथालयासाठी पाच हजार किंमतीचे पुस्तके व महाविद्यालयाच्या विकासासाठी पंचवीस हजाराचा धनादेश प्राचार्यांच्याकडे सुपूर्द केला. ॲड.जयवंतराव देशमुख यांच्या प्रयत्नातून माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पंच्याहत्तर हजाराचे पार्किंग शेड उभारणीसाठी देणगी दिली. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रा.डी.ए.पवार यांनी नॅकची भूमिका व माजी विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.आशा सावंत यांनी केले तर माजी विद्यार्थी मेळाव्याच्या समन्वयक प्रा.सौ. संगीता पाटील यांनी आभार मानताना महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आलेले विद्यार्थी पाहून भावनाशिल झाल्या व त्यांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून देऊन सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून वेगवेगळ्या क्षेत्रातील माजी विद्यार्थी व प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थी मेळावा यशस्वी होण्यासाठी प्र.प्राचार्य डॉ. बापूराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा.सौ.संगीता पाटील, प्रा.सुरज डुरेपाटील, प्रा.शिवराज उथळे, श्री. किरण बोंगाळे, श्री.महेश तुरेवाले, सचिन माने, समीर मुल्ला यांनी परिश्रम घेतले.
म्हणून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी अतिशय दुर्गम भागात शाळा, महाविद्यालये उभा करुन ग्रामीण भागातील युवकांना सक्षमपणे उभे केले. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र आले पाहिजे असे सांगून महाविद्यालयाच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे असेही ते म्हणाले. यावेळी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून देत शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष व महाविद्यालयातून मिळालेली प्रेरणा यामुळे आयुष्य घडल्याचे सांगितले. उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, रजिस्टार चंद्रकांत धोंडमणी, प्राचार्य डॉ. एल.जी जाधव, प्रा.डॉ. शिवाजीराव देशमुख, सौ.अस्मिता पवार, प्राध्यापिका सौ. वंदना पवार, प्रा.डॉ.अशोक तवर, ॲड. जयवंतराव देशमुख व कडेपूरचे सरपंच सतीशभाऊ देशमुख यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगून काळानुसार शैक्षणिक पद्धतीमध्ये कसा बदल होत गेला हे सांगून जागतिक दर्जाचे शिक्षण आपल्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात मिळाले पाहिजे अशा भावना व्यक्त करुन महाविद्यालयाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले.